पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
दारुबंदी विरोधी पथकाने दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिघी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 285/2026 अंतर्गत महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65(ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून 2026 रोजी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आळंदी वाय जंक्शन रोडलगत पीएमपीएमएल बसस्थानकाजवळील मोकळ्या मैदानातील निलगिरीच्या झाडाजवळ आरोपी रामेश्वर नाथा गंगाधर (वय 35, रा. माऊली वडापाव दुकानाजवळ, योगीराज चौक, आळंदी, पुणे) हा देशी दारूची बेकायदेशीर विक्री करताना आढळून आला.
कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून 90 मिली मापाच्या ‘सखू संत्रा’ देशी दारूच्या 131 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत 5,240 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलीस शिपाई नितीन पोपट पाटील (बकल नं. 3134), दारुबंदी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.


