spot_img
spot_img
spot_img

अबोली जरीत यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रपती पदक विजेत्या “सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन” तसेच इंडियन आयडॉल फेम अबोली जरीत यांचा सन्मान महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. 

     यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे,माजी महापौर योगेश बहल,नगरसदस्य शत्रुघ्न काटे,अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.  

      याप्रसंगी अबोली जरीत म्हणाल्या,

आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने झालेल्या या सन्मानामुळे मला अत्यंत आनंद होत आहे. या शहरात येण्याची आणि येथील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली, याचा मला विशेष आनंद आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर मला दिव्यांग भवनला भेट देण्याची संधी मिळाली. हे दिव्यांग भवन पाहून मी खरोखरच भारावून गेले. इतक्या सर्वसमावेशक पद्धतीने उभारण्यात आलेले आणि दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले असे दिव्यांग भवन मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. भारतातील पहिले दिव्यांग भवन पाहण्याचा अनुभव माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी ठरला,येथे आल्यावर मला असे अजिबात वाटले नाही की मी पहिल्यांदाच या शहरात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!