शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे स्टेशन येथील समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयासमोर आजच सुरू झालेल्या दृष्टी विश्व संस्था आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भातील आंदोलनामध्ये आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत
1. सामाजिक न्याय विभागाने वस्तीगृह प्रवेश प्रक्रियेमध्ये लागू केलेलं दिव्यांगांचं समांतर आरक्षण रद्द करून स्वतंत्र ५% आरक्षण लागू करावे.
2. स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश करावा अथवा त्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र योजना तयार करावी.
3. प्रादेशिक स्तरावर दिव्यांगांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे.
4. दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींच्या समस्यांबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत उपोषण शिष्टमंडळ समितीची बैठक आयोजित करावी.
याबाबत पिंपरी चिंचवड काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाने दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजित बढे यांची भेट घेतली आणि या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावर श्री.बढे यांनी आपल्या स्तरावरून राज्य सरकारकडे सदर प्रस्ताव पाठवण्यात आल्या बाबतचे सांगितले.
त्याबाबतचे पत्र त्यांनी शिष्टमंडळाकडे देत आंदोलन कर्त्याना भेटण्यासाठी आपले उपायुक्त भारत कांबळे यांना पाठवले.
मात्र यावर समाधान न झालेले आंदोलक हे मागण्यांवर ठाम राहिले आणि पाच टक्के समांतर आरक्षण रद्द करून विशेष आरक्षण दिव्यांगना वस्तीगृहामध्ये द्यावे अशा मागणीसाठी ठाम राहिले.
मागण्यांपैकीची ही बाब समाज कल्याण आयुक्तांच्या अखत्यारित असल्याने नंतर या काँग्रेसचे मंडळाने समाज कल्याण आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ – मुंडे यांची बार्टी पुणे येथे भेट घेतली आणि निवेदन सादर केले यावर त्यांनी या मागणीबद्दल लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले.
या दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कायदे तज्ञ असीम सरोदे आणि त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते.
आदोंलनात गौरव मालक, साबीर शेख, गणराज जाधव, शशिकांत शिंदे, सूरज रेपाळे, शुभम नरोडे हे दिव्यांग विद्यार्थी सहभागी आहेत.
शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळात काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेसचे माजी सरचिटणीस जितेंद्र छाबडा, हरीश डोळस, संदीप शिंदे, अनुसूचित जाती विभागाचे माजी अध्यक्ष विजय ओव्हाळ आदी उपस्थित होते.


