spot_img
spot_img
spot_img

डांगे चौकात ‘चिमणी पाखरू’ जुगारावर पोलिसांचा छापा; दोन महिला ताब्यात

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

वाकड पोलिसांच्या हद्दीतील डांगे चौक परिसरात सुरू असलेल्या ‘चिमणी पाखरू’ जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने कारवाई करत दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास डांगे चौक येथील सार्वजनिक शौचालयासमोरील फुटपाथवर राxxx माxxx पवार (वय ४०) आणि रेxxx मिxx आटोटे (वय ३४) या महिलांनी आर्थिक फायद्यासाठी ‘चिमणी पाखरू’ नावाचा जुगार सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार छापा टाकण्यात आला असता दोघी महिला जुगार खेळविताना आढळून आल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी दोघींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!