spot_img
spot_img
spot_img

पोलीस आयुक्त चौबे यांची धडक कारवाई; १५ जणांचे शस्त्र परवाने रद्द, ६८ अर्ज फेटाळले

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यांबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये नाव आलेल्या तसेच शस्त्रांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करत १५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या तब्बल ६८ जणांचे अर्जही फेटाळण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेल्या तपासणीत काही परवानाधारकांकडून शस्त्रांचा गैरवापर झाल्याचे तसेच त्यांच्याविरुद्ध विविध गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. यानंतर संबंधित प्रकरणांची चौकशी करून पाच जणांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच विहित मुदतीत शस्त्र खरेदी न करणारे, वृद्धत्व किंवा मृत्यू झालेल्या परवानाधारकांचे मिळून आणखी १० परवाने रद्द करण्यात आले.

दरम्यान, नवीन शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेल्या ६८ जणांकडे कोणतेही ठोस कारण अथवा कायदेशीर आधार नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि शस्त्रांचा गैरवापर रोखण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारचे कठोर धोरण कायम राहणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!