spot_img
spot_img
spot_img

मुस्लिम जमातच्या आंदोलनामुळे १२ जून रोजी पिंपरीत वाहतुकीत बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुस्लिम जमात, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने शुक्रवार, १२ जून रोजी दुपारी २.३० वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक शाखेने तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत.

पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १२ जून रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काही मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे

१) आहिल्यादेवी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग बंद

आहिल्यादेवी चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : आहिल्यादेवी चौकातून बीआरटी मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जावे.

२) गांधीनगर कॉर्नर ते महापालिका मुख्यालय मार्ग बंद

गांधीनगर कॉर्नरकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग : गांधीनगर कॉर्नरहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

वाहतूक विभागाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांवर बॅरिकेडिंग तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी नियोजित वेळेत प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!