spot_img
spot_img
spot_img

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या १९६२ या टोल-फ्री हेल्पलाइनने राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे जाळे बळकट केले आहे.

‘मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स’ म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून या उपक्रमाने विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या दारात पशुवैद्यकीय आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले असून, यामुळे पशुधनाची वेळेवर, सुलभ व विश्वासार्ह काळजी घेणे शक्य झाले आहे.

या उपक्रमाच्या यशानंतर, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड (इंडसइंड बँक) व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी ‘व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा’ सुरू केली आहे. या डिजिटल उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सेवा मिळवणे सोपे करणे, संवाद सुलभ करणे व रिअल-टाइम (तात्काळ) पशुवैद्यकीय साहाय्य प्रदान करणे हा आहे.

व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा

शेतकरी +९१९०६३१४२२९९ या क्रमांकावर संदेश पाठवून किंवा निश्चित केलेला क्यूआर कोड स्कॅन करून या चॅटबॉट सेवेचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांना त्यांच्या घरातूनच, व्हॉट्सॲपच्या अत्यंत सोप्या व वापरण्यास सुलभ इंटरफेसचा वापर करून जलद व सोयीस्कर पशुवैद्यकीय सल्ला आणि सेवा मिळाव्यात, अशा पद्धतीने हा चॅटबॉट डिझाइन करण्यात आला आहे.

शेतकरी +919063142299 या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर “Hi” पाठवून खालील सेवा मिळवू शकतात: पशुधनाचे आजार, उपचार आणि लसीकरणाबाबत माहिती मिळवणे. पशुसंवर्धन आणि सरकारी योजनांची सविस्तर माहिती मिळवणे. चॅट (Chat), ऑडिओ कन्सल्टेशन (व्हॉईस कॉल सल्ला) आणि व्हिडिओ कन्सल्टेशन, टेलिकन्सल्टेशन (व्हिडिओ कॉल सल्ला) या माध्यमांद्वारे पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधता येणार आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये: पशुवैद्यकीय टेलिकन्सल्टेशन (दूरस्थ सल्ला) सेवा, ऑडिओ व व्हिडिओ कॉलद्वारे सल्ल्याची सोय, पशुवैद्यकीय डॉक्टरांशी थेट संवाद,रुग्णालय व पशुवैद्यकीय सेवा डिरेक्टरीची (मार्गदर्शिका) उपलब्धता, सरकारी योजनांची माहिती, वारंवार विचारले जाणारे प्रश्न.  

प्रागतिक माहिती (ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६): ६१५ शेतकऱ्यांनी चॅटबॉटचा वापर करून संवाद साधला आहे. २०१ व्हिडिओ कन्सल्टेशन (व्हिडिओ कॉलद्वारे सल्ला) यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत.

उपक्रमाची उद्दिष्टे: संपूर्ण महाराष्ट्रात पशुवैद्यकीय सेवा वितरणाची यंत्रणा बळकट करणे. शेतकऱ्यांना वेळेवर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे. डिजिटल सुलभता वाढवणे आणि सेवांचा विस्तार करणे.
तात्काळ संवाद व जलद प्रतिसाद यंत्रणा सक्षम करणे.

शेतकऱ्यांना होणारे फायदे: प्रवास न करता घरबसल्या पशुवैद्यकीय सेवांची उपलब्धता, पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद, सरकारी योजना व त्यांच्या फायद्यांविषयी जागरूकतेत वाढ, सेवा मिळवण्यासाठी लागणारा वेळ व खर्चात बचत आणि पशुधनाचे आरोग्य व उत्पादकतेत सुधारणा.

डॉ. किरण पाटील, आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य: शेतकऱ्यांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व संपूर्ण राज्यात कार्यक्षम, सुलभ आणि तंत्रज्ञान-आधारित पशुवैद्यकीय आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी BFIL आणि पशुसंवर्धन विभाग हा उपक्रम परिश्रमपूर्वक कार्यरत आहे. पशुपालकांना तात्काळ पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे, या उद्दिष्टाला पशुसंवर्धन विभागाने प्राथमिकता दिली असून, पशुपालक व शेतकरी बांधवांनी १९६२ या कॉलसेंटर सेवेचा अधिकाधीक लाभ घ्यावा.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!