पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
मोरवाडी ब्रिजखालील ग्रेड सेपरेटर रोडवर पाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून तिघांनी एका बांधकाम व्यावसायिकाची कार अडवून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप विजय नाईक (वय ३६, रा. रावेत) हे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यावरून रावेतकडे कारने जात होते. त्यावेळी मोरवाडी ब्रिजखालील ग्रेड सेपरेटर रोडवर आरोपी अर्जुन पाटील, कृष्णाथ कोरडे आणि सागर घोगरे यांनी त्यांच्या वाहनाने ओव्हरटेक करताना रस्त्यावर साचलेले पाणी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांच्या अंगावर उडवले.
यानंतर आरोपींनी फिर्यादीची कार अडवून रस्ता रोखला. त्यानंतर शिवीगाळ करत हाताने मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर फिर्यादी यांनी पिंपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


