spot_img
spot_img
spot_img

सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना दिलं लेकीच्या लग्नाचं आमंत्रण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कन्या रेवती सुळे हिच्या विवाह सोहळ्याचे औपचारिक आमंत्रण दिले. दिल्लीतील या भेटीदरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांचे व्याही अरुण लखानी तसेच होणारे जावई सारंग लखानी हे देखील उपस्थित होते.

रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह सोहळा २० जून २०२६ रोजी मुंबई येथे पार पडणार असून, या विवाह सोहळ्याची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. लग्नाच्या निमंत्रणासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध पक्षांतील अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या भेटी घेत शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवरही सौहार्दपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. सुळे कुटुंबातील या आनंदाच्या सोहळ्याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!