spot_img
spot_img
spot_img

भरधाव अॅक्टिव्हाचा भीषण अपघात; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भरधाव वेगात अॅक्टिव्हा चालवताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या १८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पंढरीनाथ म्हस्के (वय १८, रा. चिंचवडगाव) हा १५ एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर रहाटणीतील नखाते वस्ती परिसरातून भरधाव वेगात अॅक्टिव्हा (MH-14/KX-3955) चालवत होता. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत असताना त्याचा भीषण अपघात झाला.

अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्बल आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २३ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!