spot_img
spot_img
spot_img

माऊली मंदिरातील दानपेटीवर डल्ला; सेवकानेच १५ हजारांची चोरी केल्याचा आरोप

शबनम न्यूज | प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीतील रकमेवरच मंदिरातील सेवकाने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी एका सेवकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल वास्ळे (वय ३३) हा मंदिरात सेवक म्हणून कार्यरत होता. दानपेटीतील पैसे काढून कॅशियर रूममध्ये जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने दानपेटीतील रक्कम चोरल्याचे समोर आले आहे.

आरोपीने दानपेटीतील पैसे बादलीत भरताना नजर चुकवून काही रक्कम पोत्यात लपवली. त्यानंतर त्या पोत्यावर फुलांचे हार ठेवून “हार घेऊन जातो,” असा बहाणा करत कॅशियर रूममधून पैसे बाहेर नेल्याचा आरोप आहे. १२, १३ आणि १६ मे रोजी अशा पद्धतीने प्रत्येकी सुमारे पाच हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांची चोरी करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधमल करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!