spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत शेअर मार्केट व IPO गुंतवणुकीच्या नावाखाली ३५.२८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

युनूस खतीब | प्रतिनिधी

हिंजवडी परिसरात शेअर मार्केट व आयपीओमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ३५ लाख २८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जॉयव्हिल शापुर्जी हौसिंग प्रा. लि. कंपनी, मान हिंजवडी येथे कार्यरत आहेत. दि. ३० मार्च २०२६ रोजी सकाळी १२:५६ ते दि. २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:१४ या कालावधीत आरोपी प्रतिमा बनसल व मयांक सचान यांनी संगनमत करून विविध मोबाईल क्रमांक व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फिर्यादीशी संपर्क साधला.

आरोपींनी फिर्यादीला विविध इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्ये अ‍ॅड करून केवायसी अपडेट करण्यास सांगितले. तसेच शेअर मार्केट व आयपीओमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ३५,२८,००० रुपये जमा करून घेत फसवणूक केली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत कलम ६६(सी), ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि पांचाळ करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!