इंधन बचतीचा संदेश देत महापौर रवि लांडगे यांचा सायकल प्रवास
पिंपरी : “इंधन बचत हीच खरी देशसेवा” या Narendra Modi यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडचे मा. महापौर रवि लांडगे यांनी आज आपल्या निवासस्थानापासून Pimpri Chinchwad Municipal Corporation च्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकलने प्रवास करून पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश दिला.
या उपक्रमात सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता अमित दिक्षित तसेच स्वीय सहाय्यक अभय चौगुले आणि संदीप पालांडे हे देखील सहभागी झाले होते.
महापौर रवि लांडगे यांनी यावेळी नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. “शक्य तिथे सायकल, सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करूया. इंधन बचत करून देशाच्या प्रगतीत आपला हातभार लावूया,” असे ते म्हणाले.
या उपक्रमामुळे शहरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला


