spot_img
spot_img
spot_img

पुण्यात भीषण आग; सिलेंडर स्फोटाने अप्पर डेपो परिसर हादरला

मंडप साहित्याला आग, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य

प्रतिनिधी | युनूस खतीब

पुण्यातील अप्पर डेपो परिसरात मंडपाच्या साहित्याला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, सिलेंडर स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आगीदरम्यान झालेल्या जोरदार स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दमकल कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेत झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!