spot_img
spot_img
spot_img

नातेवाईकानेच फोडला विश्वास; तळेगावात घरफोडीत सव्वा लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

तळेगाव दाभाडे परिसरात नात्यालाच काळीमा फासणारी चोरीची घटना उघडकीस आली असून, फिर्यादीच्या चुलत भावानेच घरातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ११ मे २०२६ रोजी सकाळी ६ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान मनोहरनगर परिसरातील नम्रता साकार सोसायटीजवळील हेमा दाभाडे यांच्या खोलीत घडली. फिर्यादी सुरज विजयकुमार गायकवाड (वय ३७) व त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले असताना आरोपी उत्तम गायकवाड (वय ४०, रा. मोरखंडी, ता. बसव कल्याण, जि. बिदर, कर्नाटक) हा त्यांच्या घरी आला होता.

यावेळी आरोपीने घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या उघड्या लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून तब्बल १ लाख २९ हजार ५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. चोरी झाल्यानंतर फिर्यादीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ तसेच भादंवि कलम ३८० अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

घरातील व्यक्ती आणि नातेवाईकांवर ठेवलेला विश्वासच फसवणुकीत बदलल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार कळसाईत करीत आहेत

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!