शबनम न्यूज | प्रतिनिधी
मेहमूदा रसूल शेख (कवयित्री /गझलकारा) यांना श्रीक्षेत्र देहू येथे 25 एप्रिल 2026 रोजी आयोजित वार्षिक बक्षीस वितरण सोहळा २०२६ मध्ये इंद्रायणी आहे साक्षीला या मासिक कवी संमेलनात ‘सर्वोत्कृष्ट कविता2024’ हा बहुमान देऊन ज्येष्ठ कवी नारायण सुमंत व कवी/गझलकार अविनाश काठवटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व दिनांक एक मे २०२६ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या खऱ्या रणरागिनींचा रिदम बिट्स अकॅडमी तर्फे सुप्रसिद्ध अंकशास्त्र तज्ञ उल्का चौधरी व एकदम बिट्सचे सर्वेसर्वा राहुल लिमये यांच्या हस्ते ‘रणरागिणी पुरस्कार २०२६’ देऊन पुरस्कृत करण्यात आले.

मेहमूदा शेख यांनी साहित्य पिठाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अहेफाज मुलाणी व सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. तसेच एकदम बीट्सचे संस्थापक सन्मा.राहुल लिमये, प्रसिद्ध निवेदक कल्पना जगताप व संपूर्ण टीमचे आभार मानले….या दुहेरी पुरस्कारामुळे मेहमूदा शेख ‘गुलपरी’ यांचे देहू आणि पंचक्रोशीतील मित्र-मैत्रिणी, सगेसोयरे व नातेवाईक यांच्याकडून कौतुक होत आहे.



