शबनम न्यूज | प्रतिनिधी
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी मध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. या प्रित्यर्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहर कार्यालयामध्ये भारत मातेचे पूजन करून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, पश्चिम बंगाल मध्ये गेले अनेक वर्ष संघर्ष करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे पश्चिम बंगालच्या जनतेला परिवर्तन हवे होते. त्याचाच परिपाक म्हणून हा विजय होय. आसाम आणि पुद्दुचेरी मध्ये देखील पक्षाला चांगले यश मिळालेले आहे .
नसरापूरच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणताही विजय जल्लोष करायचा नाही हे ठरवले. त्यामुळे पक्ष कार्यालयातच भारत मातेचे पूजन व शामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हा विजय साध्या पद्धतीने साजरा करत आहोत असे धीरज घाटे यांनी सांगितले.



