spot_img
spot_img
spot_img

हायवेवर वादातून मारहाण; दुचाकीस्वाराचा नाकाचा फ्रॅक्चर, देहुरोडमध्ये गुन्हा

सँट्रो कारचालक व साथीदाराविरुद्ध गुन्हा; डिव्हायडर क्रॉस करत अचानक गाडी घातल्याने वाद

प्रतिनिधी – युनूस खतीब | देहुरोड

जुना पुणे–मुंबई महामार्गावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीस्वाराला मारहाण केल्याची घटना देहुरोड येथे घडली असून या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहीदास शांताराम जाधव (वय ४८, रा. शेलारवाडी, ता. मावळ) हे दि. १ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी (चेतक) वरून देहुरोडहून शेलारवाडीकडे जात होते. सेंट्रल चौकाच्या पुढे, सेक्शन हॉस्पिटलसमोर डिव्हायडरजवळ, सँट्रो कार (MH 12 CY 3455) ही अचानक डिव्हायडर क्रॉस करून महामार्गावर आल्याने फिर्यादीने गाडी नियंत्रणात आणत चालकास जाब विचारला.

यावरून कारमधील नरेंद्र अशोक मुरुडकर (रा. धायरी, पुणे) व त्याचा एक साथीदार खाली उतरून फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी एका आरोपीने हाताने नाकावर जोरदार ठोसा मारल्याने फिर्यादीच्या नाकाचे फ्रॅक्चर झाले. तसेच पाठीसह शरीराच्या इतर भागांवरही मार लागला.

या घटनेप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११७ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३६ वाजता नोंदवण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बांबळे करीत असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!