स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने स्व. अजित दादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींना दर्जेदार सामने पाहण्याची संधी मिळाली, तर स्थानिक खेळाडूंना आपली कौशल्ये दाखवण्याचे तसेच पुढील स्पर्धांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.
स्पर्धेत विविध गटांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत क्रीडांगण गाजवले. विशेषतः युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या खेळातील गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढण्यास मदत झाली. तसेच 40+ गटाच्या सहभागामुळे ज्येष्ठ खेळाडूंनाही आपली क्रीडा आवड जोपासण्याची संधी मिळाली, ज्यामुळे क्रीडा संस्कृती अधिक बळकट होत असल्याचे दिसून आले.
स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे :
१) पिंपरी गाव संघटना गट
उत्कृष्ट फलंदाज : मनीष कटारिया
उत्कृष्ट गोलंदाज : कुणाल गोडेला
मालिकावीर : ओम सुर्वे
प्रथम क्रमांक : ACC संघ
द्वितीय क्रमांक : स्वराज्य क्रिकेट क्लब
तृतीय क्रमांक : फ्युरियस क्रिकेट क्लब
चतुर्थ क्रमांक : पिंपरी 11
२) 40+ गट
उत्कृष्ट फलंदाज : गणेश जाधव
उत्कृष्ट गोलंदाज : चेतन सुतार
मालिकावीर : अमोल माने
प्रथम क्रमांक : संविधान ग्रुप
द्वितीय क्रमांक : SNV A
तृतीय क्रमांक : SNV B
चतुर्थ क्रमांक : सचिन भाऊ गवळी
३) खुला गट
उत्कृष्ट फलंदाज : निलेश
उत्कृष्ट गोलंदाज : शिवम
मालिकावीर : विशाल
प्रथम क्रमांक : निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन
द्वितीय क्रमांक : गावदेवी गावठाण, उरण
तृतीय क्रमांक : नामदेव ढाके स्पोर्ट्स फाउंडेशन
चतुर्थ क्रमांक : क्रांतिवीर क्रिकेट क्लब, नवलाख उंबरे
या स्पर्धेत वरील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सीमा साळवे, सारंग कामथेकर, निकिता कदम, प्रियांका कुदळे, गिरिजादेवी कुदळे, ज्ञानोबा गव्हाणे, सुरेश शिंदे, वस्ताद दत्तोबा नाणेकर, शेखर अहिरराव, शांती सेन, मीनाताई नाणेकर, किसन कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन राजेंद्र वाघेरे, संदीप नाणेकर, जितेंद्र वाटकर, किरण शिंदे, हरिष वाघेरे, राघवेंद्र भांडगे, गणेश मंजाळ आणि सारथी काळे यांनी केले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, “स्व. अजित दादा पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी तसेच आपल्या परिसरातील युवकांना योग्य दिशा देण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रातून केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे तर शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. या स्पर्धेमुळे अनेक नवोदित खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
या भव्य स्पर्धेमुळे परिसरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून युवकांमध्ये खेळाविषयीची आवड आणि संघभावना वृद्धिंगत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



