spot_img
spot_img
spot_img

सिगारेटच्या पैशांवरून वाद; पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब

चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिगारेटच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळवडे येथील साई रत्न पान शॉपजवळ २७ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी वैभव चंद्रकांत तांबारे (वय २५, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून चिखली पोलिसांनी सचिन सुनिल पुणासे व भुषन संजय सुरडकर (दोघेही वय २५) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सिगारेटचे पैसे मागितल्यावर आरोपींनी पैसे देण्यास नकार देत वाद घातला. त्यावेळी “जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेले. त्यानंतर काही वेळातच ते पुन्हा मोटारसायकलवर येऊन फिर्यादीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटती काडी फेकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०९, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि देवकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!