spot_img
spot_img
spot_img

आकुर्डीत २६९ ग्रॅम गांजासह तरुण अटक; निगडी पोलिसांची कारवाई

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब

आकुर्डी परिसरात अंमली पदार्थांविरोधात निगडी पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाला गांजासह अटक केली आहे. उर्सुला शाळेच्या मागील भागात, दत्तवाडी परिसरात २८ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.५५ वाजता ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल म्हस्के यांनी फिर्याद दिली असून प्रेम अतुल पवार (वय २१, रा. पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून सुमारे २६९ ग्रॅम वजनाचा गांजा (किंमत अंदाजे १२,१०५ रुपये) जप्त करण्यात आला. संबंधित अंमली पदार्थ आरोपीने बेकायदेशीररित्या बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!