spot_img
spot_img
spot_img

पुण्यात ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा मोठा घाव! १९ आरोपी जेरबंद; ५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पुणे शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्यावर पोलिसांनी मोठा घाव घालत तब्बल १९ आरोपींना जेरबंद केले असून ५८ लाख १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत मेफेड्रॉन (एम.डी.) आणि गांजा विक्री करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश झाला आहे.

मा. पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांच्या आदेशानुसार परिमंडळ ७ अंतर्गत १ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान वाघोली, लोणीकंद, लोहगाव विमानतळ, चंदननगर आणि खराडी परिसरात पोलिसांनी सापळे रचत धडक कारवाया केल्या.

या कारवाईत एम.डी. आणि गांजाची विक्री तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ आरोपींना सुरुवातीला अटक करण्यात आली.

राजस्थानपर्यंत तपासाचा धागा

अटक आरोपींकडून चौकशीदरम्यान मेफेड्रॉनचा पुरवठा राजस्थानमधून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने विशेष पथक राजस्थानला रवाना केले. तेथे छापेमारी करत आणखी ६ पुरवठादार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे एकूण अटक आरोपींची संख्या १९ वर पोहोचली.

मोठा साठा जप्त

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी खालील अंमली पदार्थ जप्त केले आहेत :

२८९.१९ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.)

४२२ ग्रॅम गांजा

२६० ग्रॅम संशयित पावडर (एम.डी.चा अंश असलेली)

यासह रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ५८ लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिसांचा इशारा

ही कारवाई मा. श्री. Ranjankumar Sharma, मा. श्री. Manoj Patil यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरात ड्रग्ज विक्री किंवा सेवन सुरू असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

परिमंडळ ७ मध्ये यापुढेही ड्रग्ज माफियांविरोधात कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!