spot_img
spot_img
spot_img

श्री नागेश्वर विद्यालय मोशी-चिखलीचा जिल्हास्तरीय गुणवत्तेत तिसरा क्रमांक; गुणवत्तावाढ अभियानात उल्लेखनीय यश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘गुणवत्ता संवर्धन मूल्यांकन 2025-26’ अभियानात श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने भोसरी ‘अ’ गटातून तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

इयत्ता पाचवी ते बारावी गटातील या स्पर्धेत शैक्षणिक गुणवत्ता, उपक्रमशीलता, व्यवस्थापन आणि विद्यार्थी विकास या विविध निकषांवर शाळेचे मूल्यमापन करण्यात आले. या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेने जिल्हास्तरावर आपला ठसा उमटवला.

गुरुवारी (दि. 23 एप्रिल) पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित पारितोषिक वितरण समारंभात शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते शाळेला सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री सानप, उपमुख्याध्यापिका श्रीमती नाणेकर, पर्यवेक्षिका सौ. ठोंबरे व सौ. पंडित तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला.

या समारंभास महेश पालकर (राज्य शिक्षण संचालक), डॉ. गणपत मोरे, नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना मिळालेली ही मोठी पावती मानली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!