शबनम न्यूज | प्रतिनिधी
जाधववाडी : नऊलाख उंब्रे येथे खूनाची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. नेमके कारण आणि घटनेचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.
अधिक तपशील प्रतीक्षेत…




