spot_img
spot_img
spot_img

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने २.८५ लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

पिंपरीतील कमला क्रॉस बिल्डिंगमधील कार्यालयात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीकडून लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश सूर्यवंशी यांनी फिर्यादी किरण सूर्यवंशी (वय ४८) यांना ‘जन विकास कम्युनिटी प्रा. लि.’ या संस्थेमार्फत ५० लाखांचे मालमत्ता तारण कर्ज आठ दिवसांत मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी विविध कारणे सांगून वेळोवेळी एकूण ३ लाख ५५ हजार रुपये घेतले.

मात्र, कोणतेही कर्ज मंजूर न करता आरोपीने केवळ ७० हजार रुपये परत केले आणि उर्वरित २ लाख ८५ हजार रुपये परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. पैसे मागितल्यावर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!