spot_img
spot_img
spot_img

आता आधार कार्डसाठी चेहरा होणार स्कॅन; ओटीपी नाही

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आधार कार्डची ओळख आता फक्त ओटीपी किंवा फिंगरप्रिंटपर्यंत मर्यादित राहिलेली नाही! आता तुमच्या चेहऱ्याची ओळख हाच तुमच्या ओळखीचा सर्वात सुरक्षित पासवर्ड बनत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (आधार कार्ड) ने आणलेले आधार फेस ऑथेंटिकेशन हे तंत्रज्ञान आगामी काळात सरकारी सेवांपासून ते बँकिंग आणि पेन्शनपर्यंत प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवणार आहे.

आधारची ही नवीन प्रणाली तुमच्या चेहऱ्याद्वारे तुमची ओळख निश्चित करते. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये आधारफेस-आरडी नावाचे प डाऊनलोड करावे लागते. हे प गुगलप्ले स्टोअर आणि प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

ही प्रणाली नेमकी कशी काम करते?

  • सेवा पुरवणाऱ्या अॅपद्वारे तुमच्या फोनचा कॅमेरा सुरू होतो.
  • कॅमेऱ्यातून तुमचा प्रत्यक्ष चेहरा कॅप्चर केला जातो.
  • या प्रतिमेची पडताळणी आधारच्या सर्व्हरमधील तुमच्या आधार कार्डवरील फोटोशी केली जाते.
  • हे तंत्रज्ञान तुम्ही खरोखर जिवंत आहात याचीही तपासणी करते

याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते हेडलेस आहे. म्हणजे तुम्ही ते थेट उघडू शकत नाही. जेव्हाही एखादी बँक, सरकारी वेबसाइट किंवा सेवा पुरवणारी संस्था तुमच्या ओळखीसाठी फेस ऑथेंटिकेशन मागेल, तेव्हा हे प आपोआप बॅकग्राऊंडमध्ये क्टिव्ह होते आणि तुमचा चेहरा स्कॅन करते.

कोट्यवधी भारतीयांसाठी अनेकदा ओटीपी-आधारित पडताळणी एक मोठी समस्या बनली आहे. कमकुवत नेटवर्क, एसएमएस येण्यास होणारा विलंब किंवा सिम क्लोनिंगसारख्या समस्या सामान्य आहेत. फेस ऑथेंटिकेशन या सर्व अडचणींवर प्रभावी उपाय आहे. तसेच वाढत्या वयामुळे ज्यांचे फिंगरप्रिंट्स (बोटांचे ठसे) अस्पष्ट झाले आहेत, तसेच ग्रामीण भागातील लोकांनाही आता सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. ही संपूर्ण सिस्टम संमती-आधारित आहे. म्हणजेच, तुमच्या परवानगीशिवाय कोणतीही संस्था तुमच्या चेहऱ्याची पडताळणी करू शकत नाही.

हे तंत्रज्ञान केवळ ओळख पडताळणीसाठी मर्यादित नाही. आगामी काळात डिजिटल बँकिंग, ए-केवायसी, शासकीय कल्याणकारी योजना आणि मतदान प्रणालीतही फेस ऑथेंटिकेशनचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो. हे पासवर्डलेस फ्युचरच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल आहे, जिथे तुम्हाला पिन, ओटीपी किंवा पासवर्डची गरज पडणार नाही, फक्त तुमचा चेहराच तुमची ओळख असेल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!