शबनम न्यूज | प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याकडून दुकान मालकावर कोयत्याने व प्लास्टिक पाइपने हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. २१) रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास मरकळ रोड, चर्होली खुर्द येथील बालाजी ट्रेडर्स किराणा दुकानासमोर घडली.
आयुष उमेश रॉय (वय १९, रा. आवारे हॉस्पिटलजवळ, आळंदी ता. खेड, जि. पुणे), अभय सुखदेव पाखरे (वय २१, रा. परशराम गली, केळगाव, ता. खेड, जि. पुणे), रवि सुभाष गलबे (वय २३, रा. पद्मावती रोड, आळंदी ता. खेड, जि. पुणे), सौरभ विनोद दाभाडे (वय १८, रा. संतोषी माता मंदिरामागे, आळंदी ता. खेड, जि. पुणे) आणि प्रसाद विठ्ठलराव रारके (वय २१, रा. हजेरी मारुतीजवळ, आळंदी ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिमा राम चौधरी (वय २५, रा. रामकृष्ण मेडिकलजवळ, चर्हो ली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या हातांनी व प्लास्टिक पाइपने मारहाण केली. त्याचवेळी आरोपी आयुष रॉय याने कोयता घेऊन फिर्यादीस धमकावले.




