आशिष बारणे यांनी मांडलेल्या मोशी परिसरातील समस्या चे निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावला फोन
भारत माता चौक ते लक्ष्मी चौक दरम्यान वाहतूक कोंडी ची समस्या
मोशी चिखली रस्त्याची दुरावस्था
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सध्या पिंपरी चिंचवड शहरात जनसंवाद कार्यक्रम घेत आहेत या निमित्ताने शहर भर त्यांचे दौरे सुरू आहे.
या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी अजित पवार यांची भेट घेतली व मोशी परिसरातील समस्यांवर चर्चा केली, याबाबत निवेदन दिले निवेदन वाचताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून या समस्यांची निराकरण करण्याच्या सूचना दिल्या. यानिमित्ताने पुन्हा एकदा अजित पवार यांची कार्य तत्परता व प्रशासनावर चांगली पकड असल्याचे पहावयास मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरात उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की मोशी प्रभागातील अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, मोशी, चिखली येथील रस्त्यांची खूप मोठी दुरावस्त झाली आहे. तसेच रिवर साइड रेसिडेन्सी इथून नाशिक रोडला जोडणारा जोड रस्ता अपुऱ्या अवस्थेत आहे, शिव रोड येथील रस्ता देखील अपुरे अवस्थेत आहे .त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर भारत माता चौक ते लक्ष्मी चौक या दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथे अनेकदा अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे,
अतिश बारणे यांनी दिलेले निवेदन वाचताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून या समस्या सोडवण्यासाठी सांगितले . मोशीची नागरिकांकडून त्यांच्या समस्या मांडल्याबद्दल उपाध्यक्ष अतिश बारणे यांचे मोशी परिसरातील सर्व नागरिकांनी आभार मानले.




