spot_img
spot_img
spot_img
spot_img

आगाखान पॅलेस येथे जागतिक योग दिन साजरा

  • जिल्ह्यात विविध भागात आयोजित योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आयुष मंत्रालय भारत सरकारच्या निर्देशानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण,जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई मंडळ, प्रजापिता ब्रम्हा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २१ जून) वाजता जागतिक योग दिन आगा खान पॅलेस, कल्याणीनगर येथे साजरा करण्यात आला.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, वरिष्ठ संरक्षण सहाय्यक गजानन मंडावरे, पुरातत्व विभागाचे अभियंता
मेहेबूब शेख आदी उपस्थित होते.


यावेळी खासदार श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, दररोज योगा केल्याने आनंदी जीवन जगता येत असल्याचे योगामुळे रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.

उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल, शास्त्रीनगर, येरवडा येथे योग दिन आयोजित करण्यात आला.

यावेळी कैवल्यधाम संस्थेच्या योग प्रशिक्षकांनी विविध योगा प्रात्यक्षिके सादर केली. या प्रसंगी गेनबा मोझे विद्यालय, शास्त्रीनगरचे कर्मचारीवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

किल्ले शिवनेरीवर योग दिन साजरा

जिल्हा प्रशासन, पुणे, पुरातत्व सर्वेक्षण विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर येथील किल्ले शिवनेरी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या आवाहनानुसार जिल्ह्यात महानगरपालिका पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, वारकरी मुक्कामाच्या ठिकाण तसेच तालुक्यात शाळा, महाविद्यालयात योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

जिल्ह्यात विविध भागात आयोजित योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यावेळी कार्यक्रमात खेळाडू, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते,असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकानव्ये कळविले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!