spot_img
spot_img
spot_img

संदीप वाघेरे युवा मंचतर्फे १०वी व १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी येथील श्री संदीपभाऊ वाघेरे युवा मंचतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी इयत्ता १०वी व १२वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व इयत्ता ज्युनिअर के जी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्यांचे वाटप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, “पिंपरी परिसरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा लॅपटॉप,टॅब, शालेय बॅग सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक २१ व पिंपरी परिसरातील इयत्ता ज्युनिअर केजी ते ८ वी पर्यंतच्या ३००० पेक्षा जास्त गरीब गरजू  विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. हा सोहळा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरेल”, असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला आहे.

हा उपक्रम हा युवा पिढीला प्रोत्साहन देणारा असून, शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन रविवार ८ जून २०२५ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता श्री संदीपभाऊ वाघेरे जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले असून अधिक माहितीसाठी 9673494149 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन युवा मंचच्या वतीने  करण्यात आले आहे

विवेक वेलणकर यांचे करिअर मार्गदर्शन

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी  करीअर मार्गदर्शक व प्रसिध्द व्याख्याते श्री. विवेक वेलणकर यांचे करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाला शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, पालक व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संदीप वाघेरे यांच्या वतीने  करण्यात आले आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!