राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील दुर्गम भागातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. त्याअंतर्गत भालेकर यांनी केळीगावातील कुटुंबांसाठी या वाटपाचे आयोजन केले.
आमदार लांडगे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला. पुणे जिल्ह्यातील ५१ आदिवासी व दुष्काळग्रस्त गावांमधील गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या व्यापक मोहिमेचा केळीगावातील वाटप हा एक भाग आहे.
“राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार हाती घेतलेल्या या उपक्रमातून गरजू कुटुंबांना थेट मदत देण्यावर आम्ही भर दिला. आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केळीगावात प्रत्यक्ष गेलो आणि १५० आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. या कुटुंबांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावता आला, याचे समाधान आहे. या कामात साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार.”




Total Users : 243325