spot_img
spot_img
spot_img

महापालिका शाळेच्या अरमान खानला राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत कांस्यपदक; ग क्षेत्रीय कार्यालयात भव्य सत्कार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी अरमान अमीन खान (इयत्ता ९ वी-अ) याने ७० व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६–२७ (एस.जी.एफ.आय.) मध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना रग्बी (१४ वर्षांखालील मुले) प्रकारात कांस्यपदक पटकावले. नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली.

या यशाबद्दल ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव येथील क्षेत्रीय सभेत ग प्रभागाच्या अध्यक्षा मनीषा पवार यांच्या हस्ते अरमानचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगर सदस्या योगिता बारणे, शालिनी गुजर, नगर सदस्य तानाजी  बारणे व क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप उपस्थित होते.

या यशामागे मुख्याध्यापक शुम बॅनर्जी, क्रीडा मार्गदर्शक संतोष मोरे, क्रीडा शिक्षक कृष्णा काकडे, सिद्धी केदारी, हर्षल मुळे तसेच ग प्रभाग क्रीडा पर्यवेक्षक बन्सी आटवे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!