spot_img
spot_img
spot_img

दिवाळीत सहा गरजू रुग्णांना आर्थिक दिलासा; सागर पाचर्णे यांच्या प्रयत्नांना यश!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिवाळीच्या पावन पर्वावर सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याचे कौतुकास्पद कार्य करण्यात आले आहे.

मावळचे खासदार तथा विशेष महासंसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे आणि युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा सेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा तसेच शिवसेना वैद्यकीय कक्षाचे मावळ लोकसभा प्रमुख सागर दत्तात्रय पाचर्णे यांच्या विशेष प्रयत्नांतून तब्बल सहा गरजू रुग्णांना रुग्णालयाच्या बिलामध्ये आर्थिक सवलत मिळवून देण्यात आली.

वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे संकटात सापडलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी ही मदत मोठा दिलासा ठरली आहे. सणासुदीच्या काळात रुग्णालयाच्या बिलाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाल्याने या कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.

दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा उत्सव नव्हे, तर अडचणीत असलेल्या माणसाच्या आयुष्यात मदतीचा आणि माणुसकीचा प्रकाश निर्माण करण्याचा सण आहे. याच भावनेतून करण्यात आलेले हे कार्य खऱ्या अर्थाने समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे ठरत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!