spot_img
spot_img
spot_img

नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिवाळी निमित्त नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने वाकड येथील कमल प्रतिष्ठान माउंट लिटेरा स्कूल येथे आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ हा सांगीतिक सोहळा उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाने या सोहळ्याला विशेष रंगत आली. संगीत, संस्कृती, भारतीय परंपरा आणि सामाजिक स्नेहबंध यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

दिवाळी निमित्त भाजपा नगरसेवक राहुल कलाटे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या आनंदात नागरिकांना सहभागी करून घेत, त्यांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देण्याचा या उपक्रमामागील उद्देश होता.

राहुल देशपांडे यांच्या गायनाने रंगली सुरेल मैफल
राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमातील वातावरण संगीतमय झाले. भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा आपल्या सादरीकरणातून रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या राहुल देशपांडे यांनी आपल्या गायनातून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सुरेल सादरीकरणाचा आनंद घेताना रसिकांनी या सांगीतिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दिवाळीच्या उत्सवी वातावरणात संगीताची जोड मिळाल्याने हा कार्यक्रम उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरला. कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संगीतपरंपरेचा गौरव करण्याबरोबरच कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांची उपस्थिती
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे, विश्वास मोरे, अविनाश चिलेकर, सुनील लांडगे, वसंत कलाटे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सुलभाताई उबाळे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, पृथ्वीराज साठे, नगरसेवक कुणाल वाव्हळकर, चेतन भुजबळ, संजय काटे, काळूराम बारणे, सुरेंद्र भोईर, कुशाग्र कदम, अमित गावडे, अनंत कोऱ्हाळे, प्रमोद कुटे, राजेंद्र तरस, निलेश तरस, बापू कातळे, विराज लांडे, सचिन सानप, निलेश बोराडे, निलेश बारणे, महेश बारणे, माजी महापौर नितीन आप्पा काळजे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, सचिन चिखले, गणेश भोंडवे, धनंजय आल्हाट, राजेंद्र गावडे, राजेंद्र करपे, विशाल अप्पा कलाटे, हेमंत डांगे, हरेश नखाते, दिनेश नडे, अजिंक्य स्वामी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि शहराच्या विविध भागांतून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश
सण-उत्सवांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, नव्या पिढीला भारतीय संगीत आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख व्हावी तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याची संधी मिळावी, या उद्देशाने अशा सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होते.
‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाकड परिसरात दिवाळीचा आनंद आणि सांस्कृतिक उत्साह अनुभवायला मिळाला. राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याने दिवाळीच्या सणाला सुरेल संगीताची आणि सामाजिक एकोप्याची सुंदर जोड दिली.

“वाकडमध्ये दरवर्षप्रमाणे यंदा देखील ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गायनाचा आनंद आपल्या भागातील नागरिकांना एकत्रितपणे घेता यावा, हा यामागील मुख्य हेतू होता. आपल्या समृद्ध भारतीय संगीतपरंपरेचा अभिमान जपत, अशा सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, हीच माझी यामागील प्रामाणिक भावना आहे. या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या सर्व मान्यवरांचे, नागरिकांचे आणि रसिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”

– राहुल तानाजी कलाटे
नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!