spot_img
spot_img
spot_img

आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत

पिंपरी चिंचवड ,प्रतिनिधी ;रविवार दिनांक 25/5/2025 रोजी कासारवाडी येथे आम आदमी पार्टी आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक लढवण्याच्या संदर्भात कार्यकर्त्यांची मीटिंग घेण्यात आली त्यावेळी पिंपरी चिंचवड शहराच्या आम आदमी पार्टीच्या अध्यक्षा सौ मीनाताई जावळे यांनी कार्यकर्त्यांना असे मार्गदर्शन केले की आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळाव र लढणार आहे, आपण सर्वांनी आपापल्या प्रभागांमध्ये प्रत्येक घरोघरी संपर्क साधून पक्षाची भूमिका स्पष्ट करून जनतेची जी सार्वजनिक कामे असतील व नागरिकांचे रोजचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असा वे व पक्षाचे बळ वाढवावे असे मार्गदर्शन अध्यक्षांनी केले त्यावेळी पक्षाचे कार्यकर्तेश्री मोतीराम अग्रवाल, अय्याज,सय्यद, श्री राज चाकणे, श्री यशवंत कांबळे, कमलेश रणवरे, श्री स्वप्निल जवळे, श्री अमित खंडेलवाल, सचिन थोरात, श्री दिनेश बनेर, श्री अजय सिंग, श्री अशोक कोठावले, सो भारती जाधव इत्यादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम आदमी पार्टीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष श्री चंद्रमणी जावळे यांनी केले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!