थेरगाव शाळा संकुलातील सहा शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपक्रमाचा शुभारंभ ४,५७८ विद्यार्थी आणि 127 शिक्षक-कर्मचारी सहभागी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहराच्या निर्मितीसाठी केवळ कचऱ्याची विल्हेवाट लावणे पुरेसे नसून, कचरा निर्माण होण्याच्या ठिकाणीच त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. याच विचारातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या समन्वयाने थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण शाळा संकुलात ‘शून्य कचरा शाळा’ या अभिनव उपक्रमाचा प्रायोगिक तत्त्वावर शुभारंभ करण्यात आला. नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या योगिता बारणे यांच्या सजग नागरिक होण्यासाठी शून्य कचरा संस्कृतीचा संकल्प करून मार्फत सहा शाळांमधील ४,५७८ विद्यार्थी, सुमारे 127 शिक्षक व कर्मचारी आणि जवळपास साडे चार हजार पालक कुटुंबांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, आयुक्त विजय सूर्यवंशी, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, शिक्षण समितीचे सदस्य रिटा सानप, नगरसेवक तानाजी बारणे, पर्यवेक्षक ज्योती तापकीर, नगरसेविका योगिता बारणे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, सहाय्यक आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, पर्यवेक्षक अर्चना कांडेकर सर्व मुख्याध्यापक तसेच शून्य कचरा अभियानाच्या मार्गदर्शक अर्चना मोरे (आसरा सोशल फाउंडेशन) आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेविका योगिता बारणे यांनी सांगितले की, आज आपण शहराच्या विकासाची स्वप्ने पाहत असताना पर्यावरणाचे रक्षण आणि कचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन हीदेखील आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. मोशी येथील कचऱ्याच्या डोंगराशी संबंधित दुर्दैवी दुर्घटनेत नऊ जणांना प्राण गमवावे लागले. या मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी या घटनेतून कचरा व्यवस्थापनाचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहन केले.
कचऱ्याचे डोंगर निर्माण झाल्यानंतर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याचे योग्य व्यवस्थापन का करू नये, हा विचार मनात आल्याने शाळेपासून स्वच्छतेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजल्या, तर त्या सवयी घराघरांत आणि पुढे संपूर्ण समाजात पोहोचू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पांतर्गत थेरगाव कन्या शाळा मुली, थेरगाव मुले शाळा, थेरगाव हिंदी शाळा, थेरगाव उर्दू शाळा, थेरगाव माध्यमिक विद्यालय आणि आकांक्षा विद्यालय अशा सहा शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या अंदाजे ५० किलो कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले जाणार आहे.
यामध्ये ओला, सुका आणि घातक कचरा स्वतंत्रपणे जमा करणे, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे, सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रण करणे, घातक कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावणे तसेच एकल प्लास्टिकचा वापर टाळणे याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या अभियानाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम केवळ सहा शाळांपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जवळपास साडेचार हजार कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे शाळेत शिकविल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या सवयी घराघरांत रुजण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी हेच या अभियानाचे खरे शून्य कचरा दूत ठरतील, प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेला हा बदल आसरा सोशल फॉउंडेशन मार्फत इतर शाळेत विस्तार करण्यात येईल. आयुक्त, विजय सूर्यवंशी
*‘शून्य कचरा शाळा ते शून्य कचरा घर, शून्य कचरा सोसायटी आणि शून्य कचरा प्रभाग’* असे या अभियानाचे व्यापक उद्दिष्ट आहे. नागरिकांनी केवळ कचरा रस्त्यावर टाकून आपली जबाबदारी संपली असे न मानता, कचरा निर्माण करणाऱ्या प्रत्येकाने त्याच्या योग्य व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या मार्फत शाळांचे अर्चना मोरे सोशल फाउंडेशन यांचे मिशन शून्य कचरा कॉपी राईट संकल्पना राबवित आहे.
“मोशीच्या कचऱ्याच्या डोंगराने आपल्याला धडा दिला; आता त्या धड्याचे रूपांतर कृतीत करण्याची वेळ आली आहे. पुढच्या पिढीला कचऱ्याचे डोंगर नव्हे, तर स्वच्छ, सुंदर आणि हरित शहराचा वारसा देणे, हाच आपला संकल्प असला पाहिजे. योगिता बारणे, नगरसेवक
आज यशवंतराव चव्हाण शाळा संकुल, थेरगाव येथे ‘शून्य कचरा शाळा’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ होत आहे, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
शाळा हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली, तर भविष्यात निश्चितच जबाबदार नागरिक घडतील.
मा. नगरसेविका श्रीमती योगिता बारणे, प्रभाग क्रमांक २३ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत थेरगाव शाळा संकुलातील सहा शाळांमधील सुमारे १०० शिक्षक आणि ४,५७८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जवळपास 4,5०० पालक कुटुंबांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचणार आहे.
शाळांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या अंदाजे ५० किलो कचऱ्याचे ओला, सुका आणि घातक कचरा असे वर्गीकरण करून शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे नियोजन आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रण यावर भर दिला जाणार आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहा शाळेत नोडल शिक्षक आणि विद्यार्थी मॉनिटर्स यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. डस्टबिन फ्री शाळा, हॅप्पी डस्टबिन आणि ‘कचरा नव्हे, वस्तू’ यांसारख्या संकल्पनांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व शिकविले जाणार आहे.




Total Users : 236349