spot_img
spot_img
spot_img

दिवाळी काळात भोसरी एमआयडीसी परिसरातील कंपन्यांची सुरक्षा वाढवावी – अभय भोर यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दिवाळीच्या सणानिमित्त भोसरी एमआयडीसी परिसरातील अनेक कंपन्या सलग सहा ते सात दिवस बंद राहणार आहेत. या कालावधीत औद्योगिक परिसरात चोरीच्या घटनांची शक्यता वाढत असल्याने उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एमआयडीसी परिसरातील अनेक ठिकाणी मद्यपींचे अड्डे तयार होतात. तसेच अमली पदार्थांचे सेवन करून काही समाजकंटक कंपन्यांच्या रखवालदारांना दमदाटी करतात आणि चोरीच्या घटना घडवून आणतात. दिवाळीच्या काळात औद्योगिक परिसरात सर्वत्र शांतता आणि वर्दळ कमी असल्याचा फायदा चोरट्यांकडून घेतला जातो. त्यामुळे कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे चे अध्यक्ष अभय भोर यांनी पोलीस प्रशासनाकडे दिवाळीच्या काळात भोसरी एमआयडीसी परिसरात वाढीव पोलीस मनुष्यबळ तैनात करावे, रात्रीच्या वेळेस सातत्याने गस्त घालावी तसेच संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवावे, अशी मागणी केली आहे.
औद्योगिक परिसरातील मद्यपींचे अड्डे आणि अमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने तत्परतेने उपाययोजना कराव्यात. कंपन्यांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच उद्योजक, सुरक्षारक्षक आणि कामगारांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी.
“दिवाळीच्या काळात कंपन्या बंद असल्याने औद्योगिक परिसरातील सुरक्षेची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. पोलीस प्रशासनाने तातडीने विशेष सुरक्षा व्यवस्था आणि नियमित गस्त सुरू करून उद्योजकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे,” असे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!