शबनम न्यूज | प्रतिनिधी
खऱाळवाडी परिसरातील बीआरटी बसथांब्यावर बसलेल्या तरुणाच्या डोक्यावर सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश भारत गायकवाड (वय ३३) हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. ते कामगार भवनाच्या पाठीमागे, गांधीनगर, पिंपरी परिसरात राहतात. घटनेच्या वेळी ते खऱाळवाडी येथील बीआरटी बसथांब्यावर होते.
त्यावेळी आरोपी लक्ष्मण गोविंद बनपट्टे (वय ४३) याने कोणतेही कारण नसताना फिर्यादी आणि त्यांचे मित्र राज विलास देशमुख यांच्या डोक्यावर सिमेंटच्या गट्टूने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.




Total Users : 238179