spot_img
spot_img
spot_img

दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे नवदुर्गा सन्मान सोहळा व दांडिया महोत्सव उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा सन्मान सोहळा आणि दांडिया महोत्सवाचे आयोजन भोसरी एमआयडीसी, टी-ब्लॉक येथील दुर्गा ब्रिगेड संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला. प्रवरानगर, सांगली, बारामती आणि मुंबईसह विविध भागांतून पुरस्कारार्थी महिला या सोहळ्यास उपस्थित होत्या.

दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष  दुर्गा भोर यांच्या हस्ते मान्यवर महिला भगिनींना नवदुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी श्री. अभय दादा भोर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महिला सक्षमीकरण, महिलांचा सन्मान, सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रातील महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे स्वागत उद्योग विभागाच्या वतीने रेश्मा मुल्ला यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा अध्यक्ष अवंतिका भोर यांनी मांडले. जयश्री साळुंखे, दुर्गा ब्रिगेड संपर्कप्रमुख यांनी आभार प्रदर्शन केले.


या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपर्कप्रमुख राईसा पठाण, शहर उपाध्यक्ष रमाबाई बनसोडे, पुणे उपाध्यक्ष दीपली चव्हाण, माही शेख, कामगार आघाडीचे निरंजन मनोहर, युवा अध्यक्ष आकाश बनसोडे, कामगार आघाडीचे उपाध्यक्ष अमोल चव्हाण व कदीर पठाण तसेच क्रीडा विभागाचे अशोक बेलापूरकर यांनी विशेष योगदान दिले.

नवदुर्गा सन्मान सोहळ्यानंतर आयोजित दांडिया महोत्सवात महिला व इतर सहभागी स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उत्कृष्ट दांडिया सादर करणाऱ्या अनेक स्पर्धकांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सन्मान सोहळा आणि दांडिया महोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेणे आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. उपस्थित महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!