शबनम न्यूज | प्रतिनिधी
येथील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १७ ऑक्टोबर रोजी नवीन कक्षांचे नामकरण व देणगीदारांचा कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. यावेळी जनकल्याण समिती महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबिर, नामवंत सराफ व उद्योजक दिलीप सोनिगरा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, पुणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड कार्यवाह नरेंद्र पेंडसे हे उपस्थित होते.
हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरविंद पंडित, कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, विश्वस्त उदय यन्नेवार, समीर पाटील, भगवान तांबे, डॉ. अक्षय वाचासुंदर आणि रक्षा देशपांडे या वेळी उपस्थित होते.
पनराज पुखराज सोनिगरा फाउंडेशनकडून एक कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे. याशिवाय डॉ. जगदीश ढेकणे, डॉ. नीलिमा अमृते, डॉ. सरपोतदार, डॉ. संजीव कानिटकर, डॉ. अविनाश वाचासुंदर, फार्मास्युटिकल उद्योजक राजेश वाफना, ज्येष्ठ समाजसेवक सुरेश धोका, उद्योजक राजेश अग्रवाल आणि महावीर स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट यांनी प्रत्येक कक्षासाठी देणगी दिली आहे. त्यांनी सुचवलेली नावे कक्षांना देण्यात आली.
या निमित्ताने सर्व देणगीदारांचा गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पाहुण्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. हॉस्पिटलचे डॉक्टर, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 238186