लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पिंपरी-चिंचवड शहराच्या बैठकीत प्रचाराचा निर्धार; पदाधिकारी व कार्यकर्त्यांना परिचय पत्रकांचे वाटप
पिंपरी-चिंचवड, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक डॉ. अशोक जी. बाबुराव गायकवाड यांच्या प्रचारार्थ आज पक्ष कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी, “पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. अशोक गायकवाड यांना तीन हजार मतांच्या आघाडीने निवडून आणण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील,” असा विश्वास व्यक्त केला. प्रचार अधिक प्रभावी करण्यासाठी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना परिचय पत्रकांचे वाटपही करण्यात आले.
या बैठकीला महिला अध्यक्ष आदिती ताई क्षेत्री, पिंपरी-चिंचवड शहर संघटक नसीम भाई शेख, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष सायरा बानू शेख, उपाध्यक्ष समीना शेख, प्रभाग अध्यक्ष ममता ताई पवार, सविता लाहोरिया, प्रकाश दाभाडे, प्रसाद गायसमुद्रे, संतोष कुचेकर, आनंद भाकरे, तानाजी पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन महिला उपाध्यक्ष वृषालीताई कदम यांनी केले, तर पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अमित कुमार आर्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.




Total Users : 231919