spot_img
spot_img
spot_img

चिखलीतील महिलेची ७.२४ लाखांची ऑनलाइन फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चिखलीतील एका महिलेची ७ लाख २४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय महिलांनी फिर्यादी दिली असून त्या चिखलीतील देहू-आळंदी रस्त्यावरील लक्ष्मी चौक परिसरातील भूमी सिल्व्हरिओ येथे राहतात. ९ ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे नमूद आहे. तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तींनी शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील एका खात्यावर दोन लाख रुपये, तर बँक ऑफ महाराष्ट्रमधील रामाकांत बर्मन यांच्या नावाच्या खात्यावर ३ लाख ६२ हजार ९६२ रुपये पाठवण्यात आल्याचा उल्लेख आहे. याशिवाय अन्य व्यवहारांसह एकूण ७ लाख २४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

या प्रकरणात अज्ञात व्यक्ती आणि संबंधित बँक खात्यांचा वापर करणाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे. चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८२६/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे पाठवण्यापूर्वी संबंधित कंपनी, अॅप आणि गुंतवणूक योजनेची अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे. संशयास्पद लिंक किंवा अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून बँक खात्यांत पैसे पाठवू नयेत, असे आवाहन नागरिकांना करण्यात येते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!