शबनम न्यूज | प्रतिनिधी
वाकड परिसरात वाहन चालवून प्रवासी वाहतूक करण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत वाहनचालकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज म्हाळप्पा हेगडे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुजबळ चौकातील डॉल्फिन ट्रॅव्हल्स कार्यालयासमोरील रस्त्यावर ही घटना घडल्याचे नमूद आहे.
फिर्यादीची इर्टिगा कार थांबवण्यात आल्यानंतर आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. वाकड ब्रिजवरून प्रवासी घेऊन जायचे असल्यास प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी करण्यात आली. हप्ता न दिल्यास तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. यापूर्वीही दहा ते बारा हजार रुपये धमकावून घेतल्याचा आरोप तक्रारीत आहे.
या प्रकरणातील आरोपीचे नाव शुभम विशाल दूधभाते (वय २८, रा. भुजबळ चौक, वाकड) असे आहे.
वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२७/२०२६वाकडमध्ये वाहनचालकाकडून हप्त्याची मागणी; तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी नोंदविण्यात आला आहे. वाहनचालकांना धमकावून पैसे उकळण्याच्या या कथित प्रकाराचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




Total Users : 238217