spot_img
spot_img
spot_img

जुन्या वादातून नऊ जणांचा कुटुंबावर हल्ला! दुकानाची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरीतील बौद्धनगर परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका कुटुंबाला मारहाण करून किराणा दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी महिलेच्या मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, दुकानातील सामानाचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात नऊ जणांसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास गिरजुबाबा मंदिराजवळ, बौद्धनगर येथील फिर्यादी महिलेच्या किराणा दुकानासमोर ही घटना घडली. फिर्यादी महिला ३५ वर्षांची असून किराणा दुकान चालवते. तिचे पती भगवान माने आणि मुलगी संस्कृती माने यांच्यासह कुटुंबावर हल्ला झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी महिला, तिचे पती आणि मुलीला शिवीगाळ केली. दगड, गट्टू आणि लोखंडी कोयत्यासारख्या हत्यारांचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत यश गायकवाड याने फेकलेला दगड फिर्यादी महिलेच्या मुलीच्या डोक्याला लागल्याने तिला गंभीर दुखापत झाली, असे तक्रारीत नमूद आहे.

याशिवाय किराणा दुकानातील सामानाची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. फिर्यादीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. परिसरात दहशत निर्माण करून आरोपी निघून गेल्यानंतर काही वेळाने घरात कोणी नसताना घरातील सामानाचीही तोडफोड करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानुसार सिद्धार्थ ऊर्फ चिमुकल्या गालफाडे, दीपक ऊर्फ दिप्या केशव लोखंडे, सुखदेव जेटीथोर, प्रतीक अंकुटे, प्रथमेश विष्णू हजारे ऊर्फ किऱ्या, विशाल गालफाडे, अभिषेक व्यंकट कांबळे, गुड्या गालफाडे आणि पवन राहुल आचार्य यांच्यासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा उल्लेख पोलिसांच्या नोंदीत आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५५/२०२६ नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!