शबनम न्यूज | प्रतिनिधी
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस), चिंचवड येथे एमबीए, एमसीए बीबीए व बीसीए अभ्यासक्रमाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय ‘यशोप्रवेश-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शिस्त आणि ध्येयनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले.प्रमुख पाहुणे एल एस ऑटोमोटिव्ह कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन आणि प्रशासन विभागाचे उपमहाव्यवस्थापक प्रसाद दीक्षित यांनी उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा स्पष्ट केल्या, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय मांडलिक यांनी चाणक्य नीतीचा व्यवस्थापनातील वापर उलगडला.
डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा यांनी सायबर सुरक्षेचे महत्त्व सांगितले.दुसऱ्या दिवशी मौसमी निलाखे यांनी प्रेरणादायी सत्र घेतले. तिसऱ्या दिवशी ॲड. सीमा शर्मा यांनी पॉश कायद्याबाबत मार्गदर्शन केले, तर डॉ. कॅप्टन सी.एम. चितळे यांनी व्यावसायिक नीतिमत्ता आणि व्यवस्थापन शिक्षणावर प्रकाश टाकला.




Total Users : 231664