शबनम न्यूज | प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल रहाटणी पुणे येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता भालेराव यांनी केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राहुल मित्र मंडळ चे अध्यक्ष शांताराम भालेराव, नवयुग वितरक चे विवेक छेडा, मिलिंद निसर्गगंध व विद्या भालेराव तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी निशा मॅडम यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची आणि बौद्ध धर्माच्या शिकवणुकीची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शांती, समता, न्याय आणि मानवता या मानवी मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा दिली. भगवान बुद्धांनी दिलेला अहिंसा, स्वातंत्र्य, करुणा, बंधुता आणि समानतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या मनात चांगले संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भगवान गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करून ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संदेश देण्यात आला.




Total Users : 230868