राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत गौरव; पिंपरी-चिंचवड पोलीस दलासाठी अभिमानाची बाब
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी, युनूस खतीब
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय प्रशासकीय सेवेसाठी जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) शुक्रवारी (दि. ९) मुंबई येथे प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात त्यांना या पदकाने गौरविण्यात आले.
राष्ट्रपती महोदयांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी तत्कालीन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी आयोजित समारंभात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.
चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय सेवेची, कर्तव्यनिष्ठेची आणि कार्याप्रती असलेल्या समर्पणाची पावती मानला जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.




Total Users : 238243