शबनम न्यूज | प्रतिनिधी
साई चौक येथील लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केटमध्ये दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आमदार शंकरभाऊ जगताप आणि नगरसेवक माऊलीशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांनी नाना पाटेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच प्रतिमेसमोर मेणबत्त्या व अगरबत्ती प्रज्वलित करून आणि भाजी विक्रेत्यांनी दिवे लावून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी बोलताना भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले, “नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून गेली अनेक दशके भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप उमटवली. चित्रपटसृष्टीतील योगदानाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले. नाना पाटेकर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भूषण होते.”
नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयाची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही ते ओळखले जातात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता दाखवत त्यांनी सामाजिक कार्यात योगदान दिले.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला संजय मराठे, संदीप पाटील, नितीन कांबळे, नावेद खान, विजय पाटील, सयाजी आगलावे, बलराम भोंगे, भरतकुमार, चंद्रकांत शिकले, गणेश मते, पोपट कांबळे, योगेश पैठणे, राजकुमार शेंडकर, अजय पवार, महादेव फुलगामे, अरुण जाधव, अण्णा नायडू, पिंटू मोरे यांच्यासह अन्य मान्यवर आणि भाजी विक्रेते उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांनी नाना पाटेकर यांच्या अभिनयाचा आणि सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.




Total Users : 238294