शबनम न्यूज | प्रतिनिधी
कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदा ३२वे वर्ष दिमाखात साजरे करीत असून, महोत्सवाचे उद्घाटन रविवार, दि. ११ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. याप्रसंगी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, महापौर मंजुषा नागपुरे, माजी उपसभापती आमदार डॉ नीलम गोऱ्हे, आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. विजय शिवतारे, युवसेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच अनेक राजकीय नेते व पदाधिकारी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटनाचे खास आकर्षण
या उद्घाटन सोहळ्यात सिनेतारका भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, सानिया चौधरी, श्वेता परदेशी, झेबा शेख, डॉ. सुखदा खांडगे, मृण्मयी मोघे, आयली घिया, ऋजुता जुन्नरकर यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी असेल. या महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
दरवर्षी दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार
या उद्घाटन सोहळ्यात विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने’ सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारचे मानकरी डॉ. संजय दुधाने (क्रीडा), डॉ. ऋतुपर्ण शिंदे (वैद्यकीय), डॉ. विजय फळणीकर (सामाजिक), निकिता मोघे (सांस्कृतिक) आणि वैशाली समसापूरकर (लोक कलावंत) यांना या पुरस्काराने गौरवले जाईल असे आबा बागुल यांनी सांगितले.
भव्यदिव्य उद्घाटन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम
उद्घाटन सोहळा दरवर्षी प्रमाणे भव्य आणि नेत्रदीपक असेल. यामध्ये ‘शिव शक्ती – भरतनाट्यम’ कलाविष्कार प्रस्तुत अरुंधती पटवर्धन ग्रुप सादर करतील. ‘खंडोबा -बानू विवाह सोहळा’ विनोद धोकटे, स्वाती धोकटे व सहकलाकार कार्यक्रम सादर करतील. उद्घाटन सोहळ्याचा आकर्षण ठरणारा ‘महाराष्ट्राच्या महानायिका’ भार्गवी चिरमुले, वैशाली जाधव, सानिया चौधरी, श्वेता परदेशी, झेबा शेख, डॉ. सुखदा खांडगे, मृण्मयी मोघे, आयली घिया, ऋजुता जुन्नरकर या सिनेतारकांचा जबरदस्त हा नृत्याविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करेल. पायाल वृंदाच्या निकिता मोघे यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.
महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम
उद्घाटना नंतर पुण्यातील एकमेव सलग १० दिवस विजयादशमीपर्यंत रोज सायंकाळी ७ वाजता श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.
सोमवार दि. १२ रोजी ‘मॅजिक ऑफ बर्मन्स’ एस.डी व आर. डी यांनी संगीतबद्ध केलेल्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम विवेक पंडित आणि रुपाली आनंद सादर करतील.
मंगळावर दि. १३ रोजी ‘बॉलीवूड ऑल टाईम हिट्स’ बॉलीवूडच्या हिंदी आणि मराठी नव्या – जुन्या गाण्यांची बेधुंद मैफिल हा कार्यक्रम चंद्रशेखर महामुनी आणि भाग्यश्री डुंबरे सादर करतील.
बुधवार दि. १४ रोजी ‘जन्मशताब्दी स्वरवंदना’ श्रीनिवास खळे व यशवंतदेव यांच्या संगीतमय प्रवासाला मानवंदना देणारा कार्यक्रम धनंजय पवार आणि वैजू तांडवले सादर करतील.
गुरवार दि. १५ रोजी ‘किशोर कुमार फॉरेव्हर’ किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास हिंदी गाण्यांचा कार्यक्रम जितेंद्र भुरूक, मकरंद पाटणकर आणि मेधा चांदवडकर सादर करतील.
शुक्रवार दि. 16 रोजी ‘मजिकल मेलडीज म्युझिकल ९०’s ‘ अलका याग्निक, कविता कृष्णमुर्ती, अनुराधा पौडवाल, साधना सरगम या चिरतरुण गायिकांनी अजरामर केलेल्या गीतांची सुरेल मैफिल मनीषा निश्चल आणि दीप्ती भागवत सादर करतील.
शनिवार दि. १७ रोजी ‘ हास्यमैफल’ मराठी हास्य कवी संमेलन हा कार्यक्रम कवी बंडा जोशी, डॉ. दिलीप कुलकर्णी, स्वाती सुरुंगळीकर, अनिल दीक्षित, भालचंद्र कोळपकर आणि संदीप अवचट हे सादर करतील याचे सूत्रसंचालन अनिल गुंजाळ करणार आहेत.
रविवार दि. १८ रोजी दुपारी १२ ते रात्री १२पर्यंत सलग १२ तास चालणारा महाराष्ट्राची लोककला जतन करणारा एकमेव भव्य महोत्सव असून महिलांसाठी आकर्षण ठरलेला ‘लावणी महोत्सव’ दरवर्षीप्रमाणे विशेष आकर्षण ठरेल. यामध्ये लावणी कलावंत रोशनी मुंबईकर, वृषाली सातपुते, पूनम कुडाळकर, काव्या पुणेकर, रेश्मा, वर्षा परितेकर, मृणाल शेळके, शलाका पुणेकर, सोनाली शिंदे, कीर्ती देशमुख आणि सारिका नगरकर सादर करतील.
सोमवर दि. १९ रोजी ‘लतायूग’ लता दीदींनी वेगवेगळ्या संगीतकारांसाठी गायलेल्या गीतांची मैफिल रेश्मा मुखर्जी, अनुश्री घोरपडे आणि गफार मोमीन सादर करतील.
मंगळवार दि. २० रोजी ‘कारवाँ सितारों का’ दिलीप कुमार, राजेश खन्ना, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, अमिताभ बच्चन या अभिनेत्यांच्या गाजलेल्या गाण्यांचा ‘कारवाँ’ हा कार्यक्रम पल्लवी पत्की ढोले, संजय हिरवाळे, रफी हबीब, विनोद नरवडे, इरफान आणि कविता जवळेकर हे सादर करतील.
थेट प्रेक्षेपण दाखविणारे पुण्यातील लोकप्रिय नेटवर्क – जेटीपीएल, नेक्स्ट जनरेशन न्यूज, आयसीसी डिजिटल नेटवर्क आणि एससीसी.
या पत्रकार परिषदेत नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंडाळकर, रमेश भंडारी, जयवंत जगताप, अमित बागुल, हेमंत बागुल हे उपस्थित होते.




Total Users : 229201