शबनम न्यूज | प्रतिनिधी
भरधाव आणि बेदरकारपणे दुचाकी चालवून रस्ता ओलांडणाऱ्या ४७ वर्षीय व्यक्तीला धडक दिल्याची घटना माण-मारुंजी रस्त्यावर घडली. या अपघातात संबंधित व्यक्तीच्या हातापायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी गणेश निवृत्ती मोरे (वय २७) यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आयआयएमएस कॉलेज, मांरुंजी रोड, पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी कासिफ रईस बेग (वय २०) याने मोटारसायकल भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवली.या वेळी फिर्यादीचे वडील निवृत्ती त्रिंबक मोरे (वय ४७) रस्ता पायी क्रॉस करत असताना आरोपीच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातापायांना दुखापत झाली असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.




Total Users : 238310